किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

2023
GLOBAL NEWS MARATHI
रायगड 2 जून : छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर पार पडत आहे. राज्य सरकारकडून या सोहळ्याची भव्य दिव्य अशी तयारी करण्यात आली आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. पहाटे किल्ले रायगडावरील राज सदरेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली आहे. सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्यास सुरुवात होणार आहे. रायगडावर शिवभक्तांची गर्दी त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची राजेशाही मिरवणूक निघणार आहे.



या मिरवणुकीला राज सदरेपासून सुरुवात होणार आहे. नगारखाना, होळीचा माळ, सचिवालय, जगदिश्वर मंदिर असा या मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांनी गर्दी केली आहे. सकाळपासूनच किल्ले रायगड शिवभक्तांनी ढोल, ताशा आणि नगाऱ्यांनी दणाणून सोडलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आज सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातून शिव-शंभूंचा जयजयकार घुमणार आहे. गागाभट्ट यांचे सतरावे वंशज करणार शिवराज्याभिषेकाचा विधी गागाभट्ट यांचे सतरावे वंशज महंत सुधीर दास महाराज हे शिवराज्याभिषेकाचा विधी करणार आहेत. सकाळी 7 वाजता ध्वजारोहन सोहळा, सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळा, 10.30 वाजता श्री शिवसन्मान सोहळा आणि 11 वाजता शिवपालखी सोहळा होणार आहे. शिवराज्याभिषेकासाठीच्या चांदीच्या पालखीचं पूजन गुरुवारीच करण्यात आलं.
🙏🙏🙏