गोल्डी बरार हा सध्या कॅनडात आहे. देशाच्या बाहेर राहून भारतातील अपराधी कारवाया तो घडवून आणतो. भारतातील सगळ्या तपास यंत्रणा त्याच्या शोधात आहेत.इंटरपोलनं त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केलेली आहे. कॅनडाच्या पोलसांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्येही त्याचा समावेश आहे.



नवी दिल्ली - अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या जीवाला अजूनही धोका असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. अजूनही सलमान खान हा गँगस्टर्सच्या टार्गेटवर (Target) असल्याचं उघड झालंय. भारतासाठी मोस्ट वॉन्डेट असलेल्या गँगस्टर सतविंदर सिंह उर्फ गोल्डी बरार (Goldi barar) यानं सांगितलंय की सलमान खान अजूनही त्यांच्या टार्गेटवर आहे. संधी मिळाली तर त्याला नक्की मारु. एका एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत गोल्ही बरार यानं हा दावा केलेला आहे. यासोबतच गोल्डी बरार यानं अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. खलिस्तान चळवळीला पाठिंबा आहे का, या प्रश्नावर त्यानं या कल्पनेला पाठिंबा नसल्याचं सांगितलंय.

कोण आहे गोल्डी बरार

गोल्डी बरार हा सध्या कॅनडात आहे. देशाच्या बाहेर राहून भारतातील अपराधी कारवाया तो घडवून आणतो. भारतातील सगळ्या तपास यंत्रणा त्याच्या शोधात आहेत. इंटरपोलनं त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केलेली आहे. कॅनडाच्या पोलसांच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्येही त्याचा समावेश आहे. त्याला पकडूनदेणाऱ्याला दीड कोटींचं इनाम देण्यात येईल अशीही घोषणा यापूर्वीच करण्यात आलेली आहे. मात्र आत्तापर्यंत गोल्डी बरार पर्यंत कोणत्याही देशाचे पोलीस पोहचू शकलेले नाहीत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याचा सहभाग असल्याचं सांगण्यात येतंय. या हत्याकांडात बिष्णोई गँग आणि गोल्डी बरार यांनी कत्रितपणे त्याची हत्या केल्याचं सांगण्यात येतंय.

सलमान खानला अनेकदा आल्यात धमक्या

लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी बरार या गँगस्टर्सनी आत्तापर्यंत अनेकदा सलमानला धमक्या दिलेल्या आहेत. १९९८ पासून सलमानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत आहेत. काळं हरीण हत्याकांड प्रकरणात सलमान खानचं नाव समोर आलं होतं. तेव्हापासून बिष्णोई गँगच्या टार्गेटवर सलमान खान आहे.

सलमान खानच का टार्गेटवर

सलमान खानचं नाव १९९८ साली काळ्या हरणाच्या शिकार प्रकरणात आल्यापासून बिष्णोई समाज सलमानच्या विरोधात आक्रमक झालेला आहे. सलमान खानच्या सिनेमांवर बहिष्कार घालण्याचं आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. सलमानच्या सिनेमातील गाणीही त्यांच्या समाजात ऐकली जात नाहीत. काळं हरीण हे बिष्णोई समाजात पवित्र मानण्यात येतं. त्य़ाची शिकार सलमाननं केल्याचाआरोप आहे. त्यामुळं बिष्णोई समाज सलमानवर नाराज आहे.

बिष्णोई समाजातील असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई यानं या प्रकरणानंतर सलमानला हत्येची धमकी अनेदा दिलेली आहे. २०२१ साली सलमानच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहितीही समोर आली होती. लॉरेन्सनं सलमानला मारल्याची सुपारी राजस्थानचा गँगस्टर संपत नेहरा याला दिल्याची माहितीही समोर आली होती.