एचएसबीसी समूहाची भारतातील व्यवसायाबद्दलची बांधिलकी वेळोवेळी दिसून आली आहे. आमचे ग्लोबल सीईओ नुकतेच भारतात येऊन गेले. त्यांनी हे स्पष्ट केले, की हे दशक भारताचे असेल, भारतात मोठ्या संधी उपलब्ध असल्याने त्यांनी एल अँड टी म्युच्युअल फंड खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आम्ही एचएसबीसी समूहाच्या माध्यमातून मोठ्या समुदायापर्यंत पोहोचलो आहोत. एचएसबीसी समूह कमर्शियल बँकिंग, ग्लोबल बँकिंग आणि मार्केट्स आणि वेल्थ अँड पर्सनल बँकिंग या तीन गटांत विभागला आहे. साहजिकच बँकेच्या वैयक्तिक बँकिंग सेवेचे म्युच्युअल फंड उद्योगाला बळ मिळेल..." सांगत आहेत एचएसबीसी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) कैलाश कुलकर्णी. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास सकाळ मनी साठी त्यांच्याशी साधलेला संवाद.