GLOBAL NEWS MARATHI
हेच कळत नाही, कि आपण स्वतःला कसे बघायचे. त्या मुलीच्या चेहऱ्यावर देखील तेच प्रश्नचिन्ह होतं. त्या मुलीला मी विचारले, "आत्तापर्यंत मी जे बोललो, त्यातील महत्त्वाचे मुद्दे या क्षणी सर्वांसमोर येऊन तुला मांडायचे आहेत. तुझी तयारी आहे का ?"
"मला कसे शक्य होईल?" तिच्या चेहऱ्यावर प्रचंड गोंधळ होता.
"आता काय झाले? तू स्वतःला कसे बघतेस? मला हे जमणार नाही, हे तुझ्यात तू कुठे वाचतेस? ही भावना जिथून प्रकट होते तिथे आरशाची गरज आहे, तिथे बदल घडवण्याची गरज आहे. इथेच आत्मविश्वास राहतो.
माझ्या बोलण्याचा परिणाम तिच्या चेहऱ्यावर लगेच दिसून आला. तिच्याचेहऱ्यावरील गोंधळ जाऊन तिथे हास्य आले होते. अनेकांना आपले विचार, मन कसे वाचायचे याचे ज्ञान नसते.
हा कार्यक्रम झाला, ते व्याख्यान झालं. त्यानंतर एक गृहस्थ मला भेटले. त्यांनी माझा नंबर घेतला. ते म्हणाले, "मला तुमच्याशी वैयक्तिक, खाजगी बोलायचं आहे."
0 Comments