राजकारणाशी कोणताच संबंध नसणारे देशाचे पहिले राष्ट्रपती अब्दुल कलाम एज Abdul as -president


President भारताचे "मिसाइल मॅन म्हणून जगात प्रसिद्ध असणारे अब्दुल कलाम यांनी भारताच्या अग्नी" क्षेपणास्त्राला

उडान दिले होते.

तसेच त्यांनी भारताला " अणु शक्ती" च्या बाबतीत एक संपन्न राष्ट्र बनविले... विज्ञान आणि भारतीय संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या महत्वपूर्ण योगदानामुळे ते संपूर्ण विश्वात इतके प्रसिद्ध झाले होते

की, राजनीतिक जगतात त्यांच्या नावाचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची राजकारण्यांमध्ये जणू

स्पर्धाच रंगली होती.

अब्दुल कलाम यांची प्रसिद्धी पाहून त्यांना सण २००२ साली NDA च्या युती सरकारने राष्ट्रपती पदाच्या

निवडणुकीसाठी त्यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले होतं, आणि विरोधी पक्षाने सुद्धा त्यांचा कुठल्याच

प्रकारे विरोध न करता राष्ट्रपती पदासाठी स्वीकार केला.

अब्दुल कलाम यांच्या राष्ट्रपती पदाच्या विरोधात लक्ष्मी सहगल उभ्या होत्या, आणि अब्दुल कलाम यांनी त्यांचा भरपूर मतांनी पराभव करून विजय मिळवला होता.

त्यांनी सण २००२ साली भारताचे 11 राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती.